Monday, March 13, 2006

जांभळी फ़ुले

जांभळी फ़ुले

चांदण्याच्या रात्री, झाडाच्या सावलीत,
चालणारे आम्ही दोघे आणि पायाखालच्या
गालिच्यातील, जांभळी फ़ुले

सगळं तसं सोपही नव्हते, नव्हतं सगळं तसं अवघड,
पण नव्हते अगदीच रडु कोणाचे नव्हती कसली पडझड.
मग आता मनतुन कोण उले

२२/०२/२००६
होती वेळ पहिली, होता पहिला अनुभव,
त्या एकांतात होती भाषा नजरेची नीरव,
प्रेमाचे ते उंच झुले.

वाटा आज वेगळ्या वेगळे आज भाव,
भावनेतुन पुसुन टाकला स्वप्नामधला गाव,
तरि आज मनतुन विरह का सले

0 Comments:

Post a Comment

<< Home