तीन टिंब ...
विचारांचा जास्त गोंधळ झाला कि मजा येते. शब्द नुसते सापडत नाहित तर गायब होतात.म्हणजे बघा. मराठित विचार करायला लागल्यावर नेमके इंग्रजी शब्द आठवायला लागतात आणि मग चिड चिड होते बोलताना. (एक मिनिट... इकडे कविता लिहिता येईल !! मग चिड चिड होते बोलताना ) पण कविता आता नाही कारण आता अगोदरच चिड चिड होते आहे लिहिताना. तर मी सांगत होतो... आपण मग इंग्रजित बोलायाला लागल्यावर सगळे मराठी शब्द आठवायला लागतात ( आणि मग आपली लागते !!)
पण माझ्या बाबतीत तर, असेच काही होते विचारांच्या बाबतीत. खरं तर मनातिल विचार कागदावर मांडता यावेत म्हणुन शब्द.. पण माझी अवस्था इतकी बिकट आहे कि शब्दातुनच माझे विचार तयार होताहेत. हा कुणाचा दोष आहे ? स्वतची इतकी अगतिकता, असहायाता कशी जाहली या बद्दल मी विचार करतो आहे. पण अजुनही माझे विचार मला मांडता येत नाही, कारण अजुनही मला शब्दच आठवतात. ही कशी असहायत(आता इथे '?' लिहायला पाहिजे नाहितर कळणार नाहि कि हा प्रश्न आहे). हे तर गुलाम अलि साहेबांच्या गज़ल सारखं झालय. (मेरी आवारगी ने मुझको आवारा बन दाला,, मेरी तकदीर ने मुझे तकदीर का मारा बना डाला ) सुरवतीतच शेवट. हाच माझा विचार पण सगळे शब्द दुसरयाचे. ही भाषा माझी नाही. ही मनाची नाही. मन काही तरी वेगळच म्हणतयं पण लिहिता मात्र येत नाही.. कारण. हे भाषांतरचे काम कोण करणार ? मला आज पर्यंत हे कोणीच शिकवलं नाही. मी जे काही वागतो बोलतो लिहितो हे सगळं शिकवलेलं स्वतच अस काहिच नाहि. समाजात जगण्यासाठि मला हे सगळं शिकवं लागलं (माहिति नसताना). मल काय म्हणायचे आहे हे जर मी सगळ्यांना समजेल अश्या भाषेत लिहु शकलो नाहि तर ते कोणाला कळणार नाहि. पण मी जर सगळयांना कळणारे शब्द वापरु लागलो तर मला जे लिहायचे आहे ते कदाचित मला लिहिता येणार नाहि. काय करु..
सगळाच खेळ शब्दांचा. पण मग मला का खेळता नाही आला ? कारन जेव्हा बोलयचे तेव्हा मी बोलु शकलो नाहि. आणि आज बोललो तरी कुणाला समजु शकणार नाही. किते चिड चिड चालू आहे. कारन मी हारलोय साफ़ (सपशेल) पराभव, पण मन मानयला तयार नाहीये म्हणुन स्वतचि स्तुति करत, चालू असते गाणे स्वतच्या स्वत्वाचे. अवघड आहे ... जोपर्यन्त मी ही हार मान्य करु शकणार नाहि तो पर्यंत मी पचवू शकणार नाहि आणि पचवल्याशिवाय मला परत तयार होता येणार नाहि नविन लढाई लढण्यासाठि, पण कुठली हार ? कारण लढाईत न जिंकलेल्याना हारावे लागते. माझी व्यथा थोडी वेगळीच.. न लढताच मला हार पत्करावी लागली. ही खरच हार का? हा कोणाच पराभव ? जर मी लढलोच नाहि तर मग ही हार (जे कहि म्हणा) मी का मानयची,आणि जर मानणेच अमान्य असेल तर स्वीकार करण्याचा प्रश्नच कुठे येतो ? पण फ़रक काय पडतोय , आणि कुणाला, आपलेच दात आपलेच होठ. भाषा, डोळ्यांची असते ? असेल तर ती कळली असेल तिला ? पण मग तिलाही शेवटि शब्द हवे होते(?). कदचित ती थांबलीही होती पण,..... मल नाही बोलता आले. हेच मौन मल गिळुन बसलयं, मी बोललो तेव्हा पण काही तरी आणि ती पण कहीतरिच बोलली. कुठे तरी सुरवात व्हायल पाहिजे होति. नाहि झाली ............
कदचित सुरवातिच्या आधिच शेवट लिहिला गेला.
काय लिहु आता..... कारण तेव्हाही मौनच होते ... आताही मौनच .. नंतरही मौनच.. काय बोलयचं ? कुणाशी बोलायचं ? कसे ? कशासाठि...? हाच पराभव का ?
जो भोगावा लागतो तो पराभव आपलाच ? मी मझ्याच शब्दानि हरलो ? खरंतर शब्दांवाचुनच पण हे शब्द, ही भाषा माझी नाही. मला पूर्ण तिरस्कार आहे ह्या शब्दांचा कारण जेव्हा पाहिजे तेव्हा शब्द माझ्याकडे नव्हते. तेव्हा माझ्यकडे फक्त भावना होत्या. आता माझ्यकडे शब्द आहेत. पण भवना...
कदाचित भावना अणीए शब्द सगळच हरवल्यासारखं झालय. अस वाटते आता फक्त विचार उरलेत. नुसते विचार. सुरवात अणि शेवट नसलेले. आत सुरवात आणि शेवट हे दोन्हिंचं असणच मान्य होत नाहिये. आता फक्त मौन तीन बिन्दुन्चं ...

1 Comments:
it's amazing! how come there are no comments for such a scintillating series of articles? Your expressions, words and meanings are all very explicit in conveying their meanings, which i'm sure we all have experienced time and again.
I will give my comments on each one of the articles separately and if possible in marathi, shortly. marathi typing takes lot of time but when we see the end results, it's worth the pain(?).
your factorial and engg. college thoughts will make me write as i am involved with the same all these years.
please keep it up.
hemant patil
Post a Comment
<< Home