Tuesday, December 13, 2005

"र्झा"

२७/११/२००५

"र्झा"

- माझी ऊंची जास्त आहे म्हणुन तीला हेवा,त्वेष,मत्सर आणि निराशा होती, तेव्हा माझी ऊंची जास्त आहे म्हणुन मला दुःखं होतं. यात मोठी हानी कोणाची हे माहित नव्हतं पण दोघांची असहय्यता समान होती.जसं होतं मुंगी आणि दगडाच्या बाबतीत, मुंगी वाटेतला दगड पार करण्याचा प्रयत्न करते आणि बर्याचदा अपयशी होते. तेव्हा मुंगी आणि दगडाच्या मनातही याच भावना असतील आणि असहय्यता ही सारखीचं असणार.

- मला सगळ्यांबद्दल बोलण्यापेक्षा, वेगळ्यांबद्दल बोलायाला आवडेल.
- माणसं भरकटतात ,..... कशापासुन ? हा प्रश्ना मला महत्वाचा वाटतो.
- काही जण सगळ्यात पुढे येण्यात प्रगती मानतात, तर काही जण सगळ्यांना पुढे आणण्यात. बाकींच्या बद्दल काहिही म्हणा फ़रक नाही पडत, कारण काही जणंच विचार करण्यात मानतात.
- "माझी आई, माझं सोडुन सगळ्यांचं मनावर घेते" चालत्या बसमधे समोराच्या सीटवर बसुन फोनवर बोलणारा मुलगा. खरचं लग्नं विचार करण्याचा विषय आहे. :)
- "आई बाबा गेले" या वाक्यात उद्गार चिन्हांचा यथेच्छ वापर करा.
- आयुष्याच्या टप्प्यांवर मैत्री बदलत जाते. नवे पैलु, नवे विचार, नव्या गरजा, नवे प्रकार, नवे आकार आणि बरचं काही. .... मात्र प्रत्येक टप्प्यावर माझे मित्रच बदलले.

- आयुष्याच्या वर्तुळाला पुर्णपणे व्यापणारं, व्यास हे एक महापर्वचं, त्याहुन छोटं असं काही नाही आणि त्याहुन पूर्ण असं काही नाही.

- अहंकार - एकाच शब्दात सगळं आलं, अहंकारामधे परमेश्वराची प्राप्ती होते, त्याची जाणीव झाल्यावर परमेश्वर मिळाल्याची तृप्ती. अहंकार हे स्वतःच्या (स्वतः अहंकाराच्या ) नाशाचे मुळ आहे. जीवनाचं पण असचं आहे, जन्मातच म्रुत्यु जन्मतो.


२८/११/०५

- मन आणि बुद्धी ह्या दोन अतिशय परस्पर वावरणार्या व्रुत्ती आहेत. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आपण कोणाच्या अनुषंगाने विचार करायचा हे ठरवतो.

- अस वाटतं की देव हा गरजेचा भाग आहे.

५/१२/०५

- सगळेच शिक्शक मुलांना धडे शिकवतात, यात दोष कुणाचा ? माझ्या मते सगळेच शापित.
- सगळे अश्रु सारखेच .. ? कदाचित सगळ्या भावनाही .. बुद्धीपर्यंत कुठलीच पोहचत नाही.
- 'वासना' ह्या शब्दाने मला स्वतःची ओळख दिली, समोरच्याला ओळखण्याचा, समजण्याचा मार्ग. पण वासनेच्या आहारी जाऊन लाचार होणार्याला माणुस कस म्हणावं ? समोरचं माणुस आपल्याला आपल्या वासनेने ओळखतं याचा काय अर्थ घ्यावा ? यात अभिमान, अर्थ, आस्था, श्रद्धा, समज काय वाटावं ? वासनेबरोबर फ़क्त प्रश्न उभे राहतात, उत्तरं नाहित.

- साधी माणसं जे जगत असतात त्तेच बोलतात. मी आयुष्यावर, जीवनावर बोलतो.
- माझ्या आसपासच्या जगात साधं असणं हेच असाअधारण आहे.

- There are only 2 things in professional world, context and syntax.A story can be told on this. To sum up, success is correct syntax in right context. rest doesnt matter.

६/११/०५

- आपण काय बोलतो यापेक्षा कधी बोलतो हे महत्वाचे. त्याहुनही आपण कधी बोलत नाही हे महत्वाचे. तसचं काही, कुठे काय बोलावं यापेक्षा कुठे काय बोलु नये हे शिकावं.


७/१२/०५
- नियंत्रण - माणुस म्हणुन स्वतःची ओळख बनविण्यासाठी आवश्यक. समाज ही कल्प्नाच नियंत्रणावर उभारलेली आहे. संयम हेही नियंत्रणाप्रमाणेच आवश्यक आहे. फ़क्त संयम हे न करण्याचे कारण आणि नियंत्रण हे करण्याचे प्रोत्साहन, पण सगळ्याच व्याख्या चौकटीमधल्या.

८/१२/०५

- 'ओझं', आयुष्यात खरं नसावच, कसलही. अपेक्षा तरल असाव्यात अगदी पाण्यावरच्या तरंगासारख्या. अपेक्षा नसाव्यात अस नाही पण त्या पुर्ण होण्याची जबरदस्ती नसावी, तसं झाल्यावर आपेक्षांच ओझं व्हायला लागतं.

- एकग्रता - एखादा सरळ विचार मांडण्यासाठी आपणास जास्त शब्दांची गरज पडणार असते तेव्हा आपली एकाग्रता भंग झाली आहे असं समजावं. म्हणजेच एका वाक्यातला अर्थ समजवण्यासाठी आपण दोनपेक्षा जास्त वाक्ये वापरतो तेव्हा.....

- माणूस ( आपण म्हणा ...) स्वतःच्या पाठीवर धाप मारु शकत नाही, स्वतःला शाबाशकी देऊ शकत नाही, किंवा स्वतःला धपाटा मारु शकत नाही. म्हणुन आपल्याला जवळच्या माणसांची गरज असते. माणुस हा सामाजिक प्राणी आहे, कारण त्याला पाठ आहे.

- जगतांना, खरचं हिम्म्त महत्वाची. माणुस हिमतीवर यशस्वी होतो. फ़क्त कष्ट आणि सातत्याच्या जोरावर पुढे जाण्याला यश कसे म्हणायचं ? खरंतर सातत्य आणि कष्ट यासाठि हिम्मत लागतेच..

1 Comments:

Blogger hemant_surat said...

you are right! courage is what that counts for success. everyone works hard and all are sincere.Yet only a few succeed. That's because of courage.

Friday, March 03, 2006 5:56:00 AM  

Post a Comment

<< Home